Senior and Selection Grade Training

Get information about Senior and Selection Grade Training

Training Dates are announced.

Training Start Date- 1 June 2022

See the official letter

ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे._

खालील लिंक वर जाऊन ट्रेनिंग चे सर्टिफिकेट मिळवा.

https://training.scertmaha.ac.in/Certificates/

या लिंक वर सर्टिफिकेट वितरण बद्दल सर्व माहिती दिली आहे. आपला नोंदणी क्रमांक टाकून otp येतो. OTP दिल्यानंतर आपली सर्व माहिती भरून सबमिट करावी लागेल.

नंतर प्रमाणपत्र वितरण सुरू होईल.

स्वाध्याय कसा अपलोड करावा:

आपल्या E- Mail चा वापर करून Google Drive ओपन करावा.

स्वाध्याय ची एकच एकत्र पी.डी.एफ. बनवून ती Google Drive ला अपलोड करावी.

शेअर मध्ये जाऊन पी.डी.एफ. Anyone with the link अशी करावी.

Copy Link वर क्लिक करा व अभिप्राय मध्ये दिलेल्या जागी Paste करा.

अभिप्राय ची सर्व माहित भरा व सबमिट करा.

पी.डी.एफ. बनवण्यासाठी खालील App वापरा.

Click on the following app and install it. Use it for PDF making.

Document Scanner and PDF Maker App

अभिप्राय व स्वाध्याय कसे अपलोड करावे- खालील पद्धत वापरा.

अभिप्राय व स्वाध्याय अपलोड करण्यासाठी laptop किंवा pc चा वापर करा. त्यामुळे स्वाध्याय ची लिंक पेस्ट करणे सहज शक्य होते. Google Chrome वर खालील वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर login वर जाऊन ई मेल व springboard साठीचा पासवर्ड टाकावा.

https://infyspringboard.onwingspan.com/web/mr/login

ज्यांचे ट्रेनिंग चे सर्व व्हिडिओ व पीडीएफ पाहून/ वाचून झाले असतील तसेच जर चाचणी (टेस्ट) सोडवून सबमिट झाली असेल अशांनी खालील पद्धतीने अभिप्राय व स्वाध्याय लिंक ओपन करावी. या पद्धतीत स्वाध्याय अपडेट करता येतो.

Feedback अभिप्राय वर क्लिक करा. पॉप ऑन करा. नवीन विंडो ओपन होईल. तेथे सर्व माहिती सूचनेप्रमाणे मराठीत भरा. अंक, ई मेल इंग्रजीत भरा. Google drive मध्ये स्वाध्याय ची पी.डी.एफ. अपलोड करा. ती शेअर करा. ती शेअर टू एनीवन विथ द लिंक करा. तिची लिंक कॉपी करा व अभिप्राय मध्ये दिलेल्या जागेवर पेस्ट करा.

जर वरील पद्धतीने झाले नाही तर खालील पद्धत वापरा.

प्रोफाईल अपडेट साठी फोटोचा जो option आहे त्याच्यावर क्लिक करून Edit मध्ये जावे.

जे नाव मराठीत टाईप केले आहे तिथे ते नाव English मध्ये टाईप करणे व logout होणे.

मग परत लॉगिन करणे. स्वाध्याय संकलन आणि अभिप्राय हे पेज आता उघडेल. त्यात असलेला अभिप्रायचा फॉर्म आहे तो मराठीत भरणे व Google drive ची लिंक paste करणे…. व फॉर्म submit करणे.

फॉर्म submit झाल्यावर परत एकदा edit मध्ये जाऊन इंग्लिशमध्ये असलेले स्वतः चे नाव मराठीत टाईप करावे व logout व्हावे.

Check school wise list of teachers for senior and selection grade training.

वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची शाळानिहाय यादीत आपले नाव आहे की नाही ते तपासा.

Click below

School wise list of teachers for training

नोंदणी दुरुस्त करणे साठी खाली क्लिक करा.

या प्रक्रियेतून…
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
४. ईमेल आयडी बदलता येईल.

Click below

Change in registration

अवैध ई मेल असलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यासठी खाली क्लिक करा.

कृपया आपला ई मेल आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.

Click below

Wrong E- Mail Teacher’s List

दुबार ई मेल असलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यासठी खाली क्लिक करा.

एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.)

Click below

Double E- Mail Teacher’s List

चुकीच्या ई मेल मुळे ट्रेनिंग सुरु न झालेल्यांची यादी

Click below

List of teachers whose training is not started – District and Taluka wise

लॉगिन होत नसेल किंवा अन्य अडचणीची तक्रार करण्यासाठी खाली क्लिक करा

To raise complaint, click below

Complaint Portal- Click

See important information:

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण-

1) महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे.

2) सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

3) सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे.

The Government of Maharashtra has entrusted the responsibility of planning and monitoring of senior and selection grade training to the State Council for Educational Research and Training. Special portal has been developed for online registration for this training. Teachers of primary, secondary, higher secondary and teacher school teachers had already registered on this portal.

वरिष्ठ वेतनश्रेणी

हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१) १२ वर्षाची अर्हताकारी सेवा

12 years of qualified service

२) या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.

The committee appointed for this work finds the work of the candidates satisfactory.

३) अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

Complete at least three weeks of in-service training prescribed by the department or at least ten days or 50 hours of on-line online training prescribed by the department.

ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

He / she must have completed in-service training as prescribed by the government or he / she must have completed at least ten days of in-service training prescribed by the department.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

1) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.

2) जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.

3) शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.

4) नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.

5) एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.

6) शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.

7) मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

Objectives

1) To create awareness about National Education Policy 2020.

2) Changes in the field of education in the context of globalization, modernization and its impact on the quality of education.

3) To enable teachers to assimilate the knowledge, skills, attitudes required to improve the learning process.

4) To become self-reliant by adopting new technology for self-development, student development, institution development.

5) To enable 21st century skills to be inculcated in students.

6) To understand the ways of promoting physical and mental health and to be able to act accordingly.

7) Strengthening human rights awareness, multiculturalism and commitment to constitutional values.

निवड वेतन श्रेणी

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

1) २४ वर्षाची अर्हताकारी सेवा

24 years of qualified service

2) अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

Complete at least three weeks of in-service training prescribed by the department or at least ten days or 50 hours of on-line online training prescribed by the department.

ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

He / she must have completed in-service training as prescribed by the government or he / she must have completed at least ten days of in-service training prescribed by the department.

क) प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.

For Primary Teachers – Trained Graduates should be qualified.

प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.

Eligibility for Elementary School Headmasters – Post Graduate Trained Teachers.

माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी – प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

Trained in Secondary School – Degree for undergraduate teachers and post graduate trained teachers for undergraduate teachers should be qualified.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

1) बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.

2) मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.

3) शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.

4) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.

5) मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

6) शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.

7) जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

Objectives

1) Enabling the implementation of innovative streams to meet the changing educational challenges.

2) To enable teachers to effectively implement assessment methods and tools.

3) To develop the necessary educational work culture in teachers for effective school management organization and administrative skills.

4) To enable the school curriculum and teacher education curriculum to cope with the changes taking place as per the new National Education Policy 2020.

5) Strengthening human rights awareness, multiculturalism and commitment to constitutional values.

6) To enable teachers to assimilate the knowledge, skills, attitudes required to improve the learning process.

7) Changes in the field of education in the context of globalization, modernization and its impact on the quality of education

प्रशिक्षण शुल्क

प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

Training fees already paid online by the participants. Paid Fees will not be refunded for any reason.

शुल्क

₹२००० प्रती प्रशिक्षणार्थी

Rs. 2000 per trainee

संपर्क

ठिकाण :

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र

७०८, आर.बी.कुमठेकर रोड, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे,

महाराष्ट्र ४११ ०३०

ईमेल :

trainingsupport@maa.ac.in

फोन :

०२०-२४४७ ६९३८

For more information, visit the following training portal:

https://training.scertmaha.ac.in

See GR

Get more information about essential qualification:

Essential Qualifications for different teachers

See more:

How to make lesson plan

Related Articles

6 COMMENTS

  1. मला अद्याप वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणा संदर्भात मेल आलेला नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest Articles

You cannot copy content of this page