How to prepare English for Board Exam

How to prepare English for Board Exam

How to prepare English for Board Exam– Know more about it

12th Board Exam : Preparation for English Subject

बारावी बोर्ड परीक्षा : इंग्रजी विषयाची तयारी

Inline Ad

– डॉ. महेश अरुण काळे

नमस्कार विद्यार्थी मित्रहो,      

आपण सर्वजण २१ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासात मग्न असालच. पहिला पेपर इंग्रजीचा आहे. इंग्रजीचा पेपर म्हटले की आपल्याला दडपण येते कारण आपल्या मनात इंग्रजीविषयी अकारण भीती निर्माण झालेली असते. ही भीती दूर करण्यासाठी मी तुम्हाला कमी कालावधीत इंग्रजी विषयाची तयारी कशी करता येईल, याविषयी माहिती सांगणार आहे.

आपणा सर्वांना माहित आहे की इंग्रजी विषयाचा पेपर 100 गुणांचा असून त्यापैकी 80 गुण लेखी परीक्षेसाठी तर 20 गुण तोंडी परीक्षेकरीता आहेत.

लेखी परीक्षेत जर आपल्याला उत्कृष्ट गुण मिळवायचे असतील तर सर्वप्रथम आपण कृतिपत्रिकेच्या (Activity Sheet) स्वरूपाचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.

80 गुणांसाठी असलेल्या कृतिपत्रिकेचे चार विभागात वर्गीकरण केलेले आहे.

ते विभाग पुढीलप्रमाणे:                  

अ) गद्य विभाग 34 गुण        
ब) पद्य विभाग  14 गुण         
क) लेखन कौशल्य विभाग 16 गुण                                       
ड) कादंबरी विभाग 16 गुण

कोणता विभाग किती गुणांसाठी विचारला जातो हे माहित असणे फारच आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विभागातील उपघटकाचे गुणविभाजन ही माहित करून घ्यावे. यामुळे आपल्याला या घटकांचा आणि उपघटकांचा अभ्यास कसा करावा याचे नियोजन व्यवस्थित करता येईल.

अभ्यासाचे नियोजन:-          

अ) गद्य विभाग:-                          

या विभागात आपल्याला एक सीन (पाठ्यपुस्तकातील) उतारा आणि एक अनसीन (पाठ्यपुस्तका बाहेरील) उतारा विचारलेला असतो. याबरोबरच व्याकरणाशी संबंधित दोन वाक्ये असतात. शब्दसंग्रह साठी पण कृती दिलेली असते.

सारांश लेखन आणि माईण्ड मॅपिग हे घटक ही विचारले जातात.

या विभागाचा अभ्यास करताना आपण दररोज 1 किंवा 2 उतारे सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे. हे प्रमाण आपण आपल्या उपलब्ध वेळेनुसार वाढवू शकता. यामुळे आपल्याला उताऱ्यात उत्तरे शोधण्याचा चांगला सराव होईल. या सरावामुळे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

उतारे सोडवत असताना आपण एक काळजी अवश्य घ्यावी ती म्हणजे आपण अगोदर ॲक्टिव्हीटी (प्रश्न) वाचाव्यात व नंतर उतारा वाचावा. यामुळे निश्चितच वेळेची बचत होईल. एक-एक ॲक्टिव्हीटी वाचून लगेच उताऱ्यात त्याचे उत्तर शोधल्यामुळे आपला वेळ वाचतो.

पर्सनल रिस्पॉन्सचे उत्तर लिहिताना आपण आपले वैयक्तिक मत मांडत असतो. ते मांडत असताना आपण सकारात्मक असणे आवश्यक आहे. उतारे सोडविण्याचा सराव झाल्यामुळे व्याकरण, शब्दसंग्रह आणि सारांश लेखनाचा ही आपोआप अभ्यास होतो.

या विभागात असलेल्या माईण्ड मॅपिंग या घटकाचा ही सराव करावा. या घटकाची पाठ्यपुस्तकात व इतर पुस्तकातील उदाहरणे सोडवावीत.

अशाप्रकारे आजपासुन जरी आपण दररोज 2 उतारे सोडविण्याचा सराव केला तरी वार्षिक परीक्षेपर्यंत 50 ते 60 उतारे सोडविण्याचा सराव होईल. यामुळे इंग्रजी विषयाची वाटणारी भीती निश्चितच कमी होऊन आपले मनोबल वाढेल.

ब) पद्य विभाग:-                               

या विभागात 10 गुणांसाठी 1 सीन उतारा व 4 गुणांसाठी एक कविता रसग्रहणासाठी विचारली जाते. या विभागाची तयारी आपण गद्य विभागाप्रमाणे करू शकता. अभ्यासक्रमात एकूण आठ कविता आहेत. दररोज 1 कवितेचा अभ्यास केला तर आठ दिवसात या विभागाचा अभ्यास आपण पूर्ण करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपणाला सर्व कवितांचा आशय माहित असणे आवश्यक आहे. याचा फायदा आपल्याला कवितेचे रसग्रहण करण्यासाठी नक्कीच होतो. ही ॲक्टिव्हीटी  सोडविण्यासाठी आपल्याला मुद्दे पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे आपण कवितेचे रसग्रहण करावे.

फिगर्स ऑफ स्पीच / पोईटीक डीव्हाईस घटक 2 गुणांसाठी आहे. यासाठी आपण कवितेत आलेले सर्व संदर्भ शोधून माहित करून घ्यावेत.

पोएटिक क्रिएटिव्हिटी हा घटक ही 2 गुणां साठी विचारला जातो. यामध्ये आपल्याला एखाद्या विषयावर चार ओळींची कविता लिहायला सांगितले जाते किंवा काही ओळी देऊन कविता पूर्ण करण्यास सांगितले जाते. थोडक्यात येथे तुम्हाला तुमच्यामधील दडलेला कवी दाखविण्याची संधी निर्माण करुन दिलेली आहे.

क) लेखन कौशल्य विभाग: –    

या विभागात ए, बी, सी आणि डी असे चार घटक आहेत. प्रत्येक घटकात तीन लेखन कौशल्ये दिलेली आहेत. म्हणजेच आपल्याला एकूण बारा लेखन कौशल्यांचा अभ्यास करायचा आहे.

वर्षभर आपण या बारा लेखन कौशल्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. परंतु वार्षिक परीक्षा काही दिवसांवर आलेली आहे. आता आपण ए, बी, सी आणि डी या चारही घटकातील प्रत्येकी एक याप्रमाणे लेखन कौशल्यांची निवड करावी.

जे लेखन कौशल्य आपल्याला आत्मविश्वासाने सोडविता येईल असे वाटते त्याचीच निवड करावी. निवडलेल्या लेखन कौशल्यांचा आपण सखोल अभ्यास करावा. आपणाला एकुण 12 लेखन कौशल्यांतून प्रत्येकी घटकांतून एक (ए मधुन 1, बी मधुन 1, सी मधुन 1 आणि डी मधुन 1) याप्रमाणे केवळ चार लेखन कौशल्यांची निवड करून त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अन्य लेखन कौशल्य ही तयार करून ठेवा. कधी कधी आपण चांगले तयार करून ठेवलेल्या लेखन कौशल्यावर आलेला प्रश्न परीक्षेत अवघड वाटला तर पर्याय उपलब्ध असला पाहिजे.

या विभागाचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत म्हणजे आपण दररोज केवळ एकच लेखन कौशल्याचा सराव करावा. चार दिवसात चार लेखन कौशल्यांचा अभ्यास पूर्ण होईल. एक लेखन कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला केवळ अर्धा ते एक तास पुरेसा आहे. या विभागाचा अभ्यास करताना ॲक्टिव्हीटी कश्या विचारल्या जातात व त्यांची उत्तरे कशी लिहावीत हे समजून घेऊन लिखाणाचा सराव करावा. हा विभाग आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो.

ड) कादंबरी विभाग: –              

या विभागात ही ए, बी, सी आणि डी असे चार घटक आहेत.

ए या घटकामध्ये हिस्टरी ऑफ नॉवेल या भागावर ऑब्जेक्टिव प्रश्न विचारले जातात. तर बी, सी, आणि डी या घटकांमध्ये प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर या घटकांवर प्रश्न विचारले जातात. यामुळे कादंबरीचा अभ्यास करताना वरील घटकांवर जास्त लक्ष केंद्रित करावे.

या विभागात दिलेल्या सर्व कादंबरीचा सारांश आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कादंबरी अभ्यासताना त्यातील मेजर कॅरेक्टरवर जास्त भर द्यावा. तसेच कादंबरीत घडणारे महत्वाचे प्रसंग लक्षात ठेवावेत. प्रत्येक कादंबरीच्या शेवटी दिलेली ब्रेनस्टॉर्मिंग ही ॲक्टिव्हीटी वारंवार सोडविण्याचा सराव करावा. यासाठी आपण दररोज एक कादंबरीचा सखोल अभ्यास करावा. म्हणजेच चार दिवसात या विभागाचा अभ्यास पूर्ण होईल.

थोडक्यात आपण दररोज इंग्रजी विषयासाठी किमान एक ते दीड तास वेळ द्यावा. या पद्धतीने आजपासून जरी अभ्यास केला तरी नक्कीच आपला आत्मविश्वास वाढेल व इंग्रजी विषयाची भीती निघून जाईल. चला तर मग अभ्यासाला लागा.

अ) गद्य विभाग दररोज एक किंवा दोन उतारे सोडविणेअर्धा तास किंवा एक तास     
ब) पद्य विभाग दररोज एक किंवा दोन उतारे सोडविणेअर्धा तास किंवा एक तास
क) लेखन कौशल्यदररोज एक लेखन कौशल्य अभ्यासअर्धा तास
ड) कादंबरी विभागदररोज एक कादंबरीचा अभ्यासअर्धा तास

उत्तरपत्रिका लिहिताना करावयाचे वेळेचे नियोजन:-

उत्तरपत्रिका लिहिताना आपण वेळेचे भान ठेवणे आवश्यक आहे. पेपर संपल्यानंतर विद्यार्थी सांगतात की वेळच पुरला नाही. यासाठी आपण वेळेचे नियोजन व्यवस्थित केले तर आपल्याला नियोजित वेळेत पेपर संपविता येईल. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, हे ठरविणे आवश्यक आहे.

आपण पुढीलप्रमाणे वेळेचे नियोजन करू शकता.           

गद्य व पद्य विभागावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकी 20 मिनिटांचा वेळ घेऊ शकता.

लेखन कौशल्य व कादंबरी विभाग यावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकी 10 किंवा 15 मिनिटे वेळ घेऊ शकता.

खालील पद्धतीने वेळेचे नियोजन करता येईल-

प्रश्न क्रमांक 130 मिनिटे
प्रश्न क्रमांक 235 मिनिटे
प्रश्न क्रमांक 325 मिनिटे
प्रश्न क्रमांक 440 मिनिटे  
प्रश्न क्रमांक 540 मिनिटे
एकूण170 मिनिटे

राहिलेल्या 10 मिनिटात आपण लिहिलेली उत्तरे वाचून त्यातील चुका (असतील तर) दुरुस्त कराव्यात. तसेच उत्तरातील महत्त्वांच्या शब्दांना अधोरेखित करावे.

नियोजित वेळेपूर्वी परीक्षा कक्षाच्या बाहेर न येता आपण लिहिलेल्या उत्तरात आणखी काही मुद्द्यांची भर घालण्याचा प्रयत्न करावा.

याप्रमाणे आपण घरी वेळ लावून वार्षिक परीक्षेपूर्वी किमान दोन ते तीन ॲक्टिविटी शीट सोडविण्याचा सराव करावा.

परीक्षेपूर्वी सोडवलेल्या ॲक्टिव्हीटी शीट विषय शिक्षकाकडून तपासून घ्याव्यात.

अशाप्रकारे आपण नियोजनबद्ध अभ्यास केला तर आपली इंग्रजी विषयाची तयारी उत्तम होईल. आपण परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.      

परीक्षेत घवघवीत यश मिळविण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. ‘गुण’वंत व्हा. 

डॉ. महेश अरुण काळे

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती.

मो. 9405548692

makalejam@gmail.com

See More-

1) HSC Board Sept.2021 Activity Sheet

2) HSC Board March 2022 Prose section

3) HSC Board March 2022 Poetry Section

4) HSC Board March 2022 Novel Section

5) Std. XII – First Term Exam Activity Sheet

6) Std. XII – Practice Unit Tests

7) HSC English Practice Question Papers

इंग्रजी विषयाच्या विशेष तयारी साठी खालील ॲक्टिव्हीटी वर्क बुक चा वापर करा. आदर्श उत्तर शेवटी दिलेली आहेत. त्याचा वापर करून स्वत: आपले उत्तर तपासता येते.


How to prepare English for Board Exam-

1) Read the textbook content thoroughly.

2) Remember the content of each topic.

3) Concentrate on the format of activity sheet.

4) Solve maximum activity sheets on each topics.

5) Pay attention to writing skill topics and their formats.

6) Use all good online resources.

Planning as per the questions and available time

Guidelines for dealing with novel and writing skill section

Day wise plan of study


How to prepare English for Board Exam- Know it in English

Bottom Ad

27 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here