To Sir, with Love

To Sir, with Love

To Sir, with Love 

By: E. R. Braithwaite

Writer:- E.R. Braithwaite:

Inline Ad

Eustace Edward Ricardo Braithwaite, known as E.R. Braithwaite, was a Guyanese-American writer, teacher and diplomat. He was best known for his stories of social conditions and racial discrimination against black people.

युस्टेस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट, ज्यांना ई.आर. ब्रेथवेट म्हणून ओळखले जाते, ते गुयानी-अमेरिकन लेखक तसेच शिक्षक आणि मुत्सद्दी होते. सामाजिक परिस्थिती आणि कृष्णवर्णीय लोकांवरील वांशिक भेदभावाच्या कथांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

Novel: To Sir, with Love

‘To Sir, with Love’ is an autobiographical novel. The narrator is an engineer, but to make both ends meet, he accepts the job of a teacher in a rough London East End school. The school is full of troublemaker students who were rejected from other schools for their behaviour. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect.

‘टू सर, विथ लव्ह’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. निवेदक एक अभियंता आहे, परंतु जगण्यासाठी उत्पन्न मिळावे म्हणून त्याने लंडनच्या ईस्ट एंड शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ही शाळा समस्या निर्माण करणाऱ्या व ज्यांना त्यांच्या वागणुकीमुळे इतर शाळांमधून नाकारण्यात आलेले होते अशा विद्यार्थ्यांनी भरलेली होती. सुरुवातीला निवेदकाची विद्यार्थ्यांकडून थट्टा केली जाते आणि त्याला त्रास दिला जातो परंतु नंतर त्याचे शांत वर्तन आणि विद्यार्थ्यांना यशस्वी पाहण्याची इच्छा हळूहळू निवेदकाला विद्यार्थ्यांमध्ये आदर मिळवून देते.

Characters:-

Ricky Braithwaite- Narrator and Teacher

Mr. Florian- Head Master

Mrs. Dale-Evans- Teacher

Miss. Phillips- Teacher

Mr. Watson- Teacher

Miss. Gillian Blanchard- Teacher

Denham- Student

Miss. Dare- Student.

Miss Joseph- Student.

Patrick Fernman- Student.

Jackson- Student.

Miss Pegg- Student.

Dodd- Student.

Pamela Dare- Student

Theme of the Novel:

Student-teacher relationship

Prejudice and racism

Development in students

Synopsis of the Novel extract:

In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students’ Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. Braithwaite’s class representatives speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learnt about different people, cultures, customs, and the importance of international and interracial cooperation.

The students presented their humanitarian and broad outlook on the background of racism and discrimination of that time. They also showed respect to other students and the teachers. The extract also deals with the clash between the student Denham and the teacher Mrs. Dale-Evans about the need of P.T. in the curriculum of school. Here Mrs. Dale-Evans outwitted Denham by telling the importance of P.T. Denham accepted his defeat.

Detailed information of the novel extract: To Sir, with Love

पंधरा नोव्हेंबरला स्टुडंट कौन्सिलचं सहामाही अहवाल वाचन होतं. ग्रीनस्लेड स्कूलच्या वार्षिक वेळापत्रकातील हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. या प्रसंगाविषयी मी बरंच काही ऐकून होतो. हा दिवस जसजसा जवळ येत चालला होता, तसतसं मुलांच्या उत्साहाला उधाण येत चाललं होतं. मुलांच्या बरोबरीनं त्यांच्या त्या आनंदात मीही सहभागी होत चाललो होतो. हा संपूर्ण दिवस मुलांचा असे. कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यापासून तो थेट कार्यक्रमाचं प्रत्यक्ष सादरीकरण आणि सूत्रसंचालन असं सगळं मुलांच्याच हातात असे. माझ्या वर्गाचीही तयारी जोरात चालू होती. मी रोज त्यांचं कुतूहलानं निरीक्षण करत असे. मुलं आपापसांत कामाचं, जबाबदारीचं कसं शिस्तबद्ध रीतीनं विभाजन करत होती, हे पाहून माझा ऊर अभिमानानं भरून येई.

तो दिवस उजाडला. सगळी मुलं नवे कोरे कपडे घालून, बुटांना चकचकीत पॉलिश करून शाळेत आली. या कार्यक्रमामध्ये जबाबदारीचं पद मिस् जोसेफ आणि डेनहॅम यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. दोघेही आपल्या सर्व सहकाऱ्यांची तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही, हे बघत हिंडत होते.

बरोबर दहा वाजता घंटा झाली. सगळे शाळेच्या मुख्य सभागृहात जमले व वर्गवार एकत्र बसले. मिस जोसेफ आणि डेनहॅम हे दोघे व्यासपीठावर आपापल्या खुर्व्यांवर जाऊन बसले. दोघांच्या मधोमध मि. फ्लोरियन बसले. सभागृहात शांतता पसरल्यावर ते उठून उभे राहिले व त्यांनी मुलांना उद्देशून भाषण केलं. ते बराच वेळ बोलत होते. शाळेची ध्येयधोरणे, शाळेत अवलंबण्यात येणारी अभिनव शिक्षणपद्धती आणि या दोन्ही गोष्टींमध्ये प्रत्येक मुलाचा शाळेत अपेक्षित असलेला सहभाग, या विषयावर ते तपशीलवार बोलले. जिथे मुलांनी चांगलं काम केलं होतं, त्याचा उल्लेख त्यांनी कौतुकाचे शब्द वापरून केला. पण तरीही अजून खूप काही करायचं बाकी आहे, हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं. मुलांच्या एकंदर वर्तनात, स्वच्छतेत आणि जिज्ञासू वृत्तीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

मी त्यांचं भाषण एकचित्तानं ऐकत होतो. माझ्या असं लक्षात आलं की, ही शाळा हे त्यांच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनून गेलेलं आहे. ही शाळा आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीशी ते तादात्म्य पावलेले होते. भाषणाच्या वेळी त्यांनी मुलांच्या कौन्सिल मीटिंगमध्ये त्यांना यश मिळो अशी प्रार्थना केली व टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व्यासपीठावरून खाली उतरले.

यानंतर पुढचा कार्यक्रम जोरात सुरू झाला. सुरुवातीला मिस् जोसेफनं उभं राहून स्टुडंट्स कौन्सिलचा हेतू विषद केला आणि त्यांच्या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधींनी पुढे येऊन त्या वर्गानं गेल्या सहामाहीत केलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर करायचा होता. प्रत्येक विषयासाठी एक-एक प्रतिनिधी निवडण्यात आला होता. सर्व वर्गांचे अहवाल सादर करून झाले की शिक्षकांचं पॅनेल व्यासपीठावर येऊन बसणार होतं. या पॅनेलमधील कोणत्याही शिक्षकास मुलांनी उभं राहून प्रश्न विचारायचे व त्या त्या शिक्षकानं त्यांची उत्तरं द्यायची, असा प्रघात होता. त्या पॅनेलवर कोणकोणत्या शिक्षकांची नेमणूक करायची, हे मात्र पूर्णपणे मुलांनीच ठरवायचं होतं.

अहवालवाचन सुरू झालं. सर्वात खालच्या वर्गाला पहिल्या प्रथम संधी मिळाली. ही मुलं बारा वर्षांची होती. गेल्या उन्हाळ्यात ती या शाळेत आली होती. त्यांच्यापैकी बरीच मुलं खूप बुजरी होती. सगळ्या शाळेपुढे उभं राहून अहवाल वाचायला घाबरत होती. पण तरीही त्यांनी ते काम व्यवस्थित पार पाडलं. आपल्याला हवी असलेली माहिती आपणच गोळा करण्याचं हे काम त्यांना पहिल्यांदाच करावं लागलं होतं. साहजिकच त्यांचे अहवाल जरासे त्रोटक होते.

एका पाठोपाठ एक सगळ्या वर्गाचे वर्गप्रतिनिधी पुढे येऊन आपला अहवाल सादर करत होते. खालच्या वर्गापेक्षा वरच्या वर्गातील मुलांनी सादर केलेल्या अहवालात बरीच सुधारणा दिसून येत होती. वरच्या वर्गातील मुलांनी स्वत:चे विचार जास्त व्यवस्थितपणे मांडले होते.

अखेर माझ्या वर्गाचे प्रतिनिधी व्यासपीठावर आले. मी खुर्चीत ताठ बसलो. मनात थोडी धाकधूक होती. डेनहॅमनं हातातील यादीमधून एकेका प्रतिनिधीचं नाव मोठ्यांदा वाचून दाखवलं. त्यातील प्रत्येकजण कोणत्या विषयाचा वृत्तांत सादर करणार आहे. हे सुद्धा त्यानं सांगितलं.

पॉटर – अंकगणित

सेपियानो – निसर्गशास्त्र

मिस् पेग आणि जॅकसन – भूगोल

मिस् डेअर आणि फर्नमान – शरीरविज्ञान

मिस् डॉड्स – इतिहास

डेनहॅम – शारीरिक शिक्षण व क्रीडा

मिस् जोसेफ – गृहशास्त्र

हे सगळं ऐकत असताना मला माझ्या मुलांचा प्रचंड अभिमान वाटत होता. आमच्या वर्गातील मुलींचं नाव उच्चारताना डेनहॅम आदरपूर्वक प्रत्येक मुलीचा उल्लेख ‘मिस्’ असा करत होता. लहान वर्गातील मुलांनी नक्कीच मनात त्या गोष्टीची नोंद करून ठेवली असेल. डेनहॅमने नावे उच्चारताच प्रत्येक जण धीरगंभीरपणे व्यासपीठावर येऊन आपापल्या जागी बसले.

त्यानंतर मिस् जोसेफनं एक छोटंसं भाषण केलं. तिनं आपल्या भाषणात असं सांगितलं, की त्यांना जेवढे म्हणून पाठ शिकण्यासाठी नेमले होते, त्या सर्वांमधून विश्वबंधुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने मांडलेला होता. प्रत्येक पाठातून त्यांना असाच संदेश दिलेला होता, की भौगोलिक पार्श्वभूमी, वर्ण, वंश, पंथ या सर्वांमध्ये भिन्नता असलेल्या व्यक्तीसुद्धा परस्परांवर अवलंबून असू शकतात.

नंतर तिनं पॉटरचं नाव पुकारलं वजन-मापांच्या बाबतीत त्यांनी जे प्रयोग केले, त्याविषयी पॉटरनं माहिती दिली. किलोग्रॅम आणि पाउंड यांचा परस्परसंबंध, त्याचप्रमाणे मीटर व फूट यांमधील परस्परसंबंध याविषयीसुद्धा तो बोलला. त्यानं असं सांगितलं, की या दोन्ही पद्धतीच जगभर सर्वत्र आलटूनपालटून वापरण्यात येतात. यातून सर्व जगातील लोकांचं परस्पर सामंजस्य दिसून येतं.

‘शेतातील गहू, कापूस, बटाटे अशा पिकांवर पडणारी कीड’ या विषयावर वर्गाने जो अभ्यास केला होता, त्याविषयी सेपियानो बोलला. जगातील एकंदर किती देशांनी या विषयावर संशोधन केलेलं आहे, त्याविषयीची आकडेवारी त्यानं दिली. शिवाय या कीटकांच्या प्रजोत्पादनाच्या सवयी आणि स्थलांतराची प्रवृत्ती आणि त्यांचा नाश करण्यासाठी विविध देशांनी हाती घेतलेली मोहीम अशा सर्वच विषयांना त्यानं स्पर्श केला.

भूगोलाचा वृत्तांत मिस् पेग आणि जॅकसन यांनी मिळून सादर केला. प्रथम खनिजसंपत्ती व वनस्पतींचं जगभरातील विभाजन याविषयी तो बोलला. एखादा देश एखाद्या बाबतीत श्रीमंत असेल तर दुसऱ्या काही गोष्टींचा तेथे कसा तुटवडा असतो हे विषद करून त्या अनुषंगानं परत एकदा देशादेशांमधील, म्हणजेच पर्यायानं मानवामानवांमधील परस्परसंबंधाचा मुद्दा त्यानं मांडला. त्यानंतर मिस पेगनं हाच मुद्दा पुढे सविस्तर सांगितला. युद्धसमाप्तीनंतर जगात अन्न, वस्त्र व निवारा या तीनही जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झालेला आहे असं सांगून तिनं युद्धामुळे बेघर झालेल्या हजारो निर्वासितांचा प्रश्नही उपस्थित केला. त्याचप्रमाणे याबाबतीत युनिसेफनं जे काही उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांची माहितीही तिनं दिली.

नेहमीप्रमाणे फर्नमाननं हुकमाचा एक्का स्वतःकडे ठेवला होता. त्याचं नाव पुकारण्यात आल्याबरोबर तो व्यासपीठावर आला आणि त्याने विंगेत उभ्या असलेल्या कोणालातरी खूण केली. त्याबरोबर वेल्श आणि अॅलिसन आतून एक मानवी सांगाडा उचलून घेऊन आले. त्यांनी व्यासपीठाच्या मधोमध एक लाकडी स्टँड उभा केला व त्यावर तो सांगाडा लटकत्या स्थितीत उभा टांगून ठेवला. तो सांगाडा जागच्या जागी थोडासा हलताच सभागृहात हास्याची लकेर उठली. ते सगळं दृश्य एकंदर गंमतीशीर होतं.

नंतर फर्नमाननं आपल्या खड्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली; त्याबरोबर प्रेक्षागृहात शांतता पसरली. त्याचे शब्दोच्चार खणखणीत व सुस्पष्ट होते. त्याला अभिनयाचं अंग सुद्धा होतं. हा सांगाडा एका स्त्रीचा असून ही गोष्ट आपल्याला कशी सिद्ध करून दाखवता येईल, तेही त्यानं सांगितलं. परंतु ही स्त्री चायनीज होती, की फ्रेंच, जर्मन का ग्रीक, तिचा वर्ण श्वेत होता, पीत की कृष्ण हेही आपण सांगू शकत नाही, असं तो म्हणाला. यावरूनच त्यांच्या वर्गानं असा निष्कर्ष काढला होता, की मूलत: सर्व माणसे ही सारखीच असतात. वरची सजावट जरी वेगळी असली तरी आतून शरीररचनेचा आराखडा अगदी एकसारखाच असतो. फर्नमानचं संभाषण कौशल्य, त्याचा सभाधीटपणा अवर्णनीय होता. प्रेक्षागृहातील सर्वजण जिवाचा कान करून त्याचं बोलणं ऐकत होते.

त्याच्यानंतर मिस् डेअर व्यासपीठावर आली. तिचं संभाषण आत्तापर्यंतच्या सर्व कार्यक्रमावर कळस चढवणारं होतं. तिलाही त्याची पूर्ण जाणीव असावी. संपूर्ण मानवजातीपुढे अनारोग्य, रोगराई यांचं संकट उभं होतं व त्या संकटाचा सामना करण्यासाठी जगातील सर्व माणसांनी बंधुभावानं एकत्र येण्याची गरज होती. विचारांची व ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची गरज होती.

मिस डॉड्सनं इतिहास हा विषय आपल्या इतिवृत्तासाठी घेतला होता. वर्गाला यावर्षी इंग्लंडमधील प्रबोधन हा विषय होता. धर्मसंस्थेचा समाजावर असलेला पगडा व त्याविरुद्ध, रूढी व परंपरांविरुद्ध विविध व्यक्तींनी दिलेला लढा- याविषयी नी विस्तारानं बोलली. या काळातच आपली संस्कृती सोडून दुसऱ्या संस्कृतींबद्दलही सहिष्णुता बाळगणं, त्याचप्रमाणे परक्या संस्कृतींचा अभ्यास करून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणं, अशा गोष्टींना सुरुवात झाली.

डेनहॅमचा अहवाल या सर्वांच्या मानानं जरा धक्कादायक होता. शारीरिक शिक्षण व क्रीडा हा विषय शिकवताना त्याचा जो काही आराखडा तयार करण्यात आला होता, त्यावर डेनहॅमनं सडेतोड टीका केली. या विषयाच्या प्रशिक्षणासाठी शाळेकडे पुरेशी जागा उपलब्ध नसून त्यामुळे तो विषय शिकताना विद्यार्थ्यांपुढे काय काय अडचणी येतात, हे त्यानं स्पष्ट केलं. शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली शाळेत जे काही घेण्यात येतं ते निरर्थक आणि कंटाळवाणं असून विद्यार्थ्यांना त्यापासून काहीही फायदा होत नाही,

असं त्यांन प्रतिपादन केलं. त्यापेक्षा त्या तासाला एखादा सामना घेणं कितीतरी उत्तम, असं त्यांचं म्हणणं होतं. प्रेक्षागृहात जमलेली सर्वच मुलं त्याच्याशी सहमत होती, त्यामुळे त्यांनी टाळ्यांचा गजर केला.

त्यांनतर त्या हॅटमध्ये हात घालून डेनहॅमने एक-एक करत तीन चिठ्या बाहेर काढल्या व त्या शिक्षकांची नावं वाचून दाखवली. मि.वेस्टन, मिसेस डेल ईव्हान्स व मिस् फिलिप्स. यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना प्रेक्षागृहात परत पाठवण्यात आलं आणि या तीन शिक्षकांनी त्यांची जागा घेतली. मि. वेस्टन आपल्या गबाळ्या अवतारात मधोमध बसला व दोन्ही बाजूंना दोन्ही शिक्षिका बसल्या. आता प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू झाला.

यानंतर जे काही झालं, ते मी कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ सर्वच प्रश्न वरच्या दोन वर्गाकडून येत होते. खालच्या वर्गातील मुलं लहान असल्याने प्रश्न विचारायला घाबरत असावी. कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत, याची शिक्षकांनाही पूर्वकल्पना नसल्यामुळे ते उत्तर देताना चाचरत होते. परत इथेही मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मिस् युफेमिया फिलिप्स हिला मी इतके दिवस उथळ व पोरकट समजत होतो. पण आत्ता डोकं शांत ठेवून अजिबात न अडखळता तिनंच मुलांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तिला मुलांनी जे काही विचारलं, त्यावर ती अधिकारवाणीनं बोलली, स्पष्टपणे काहीही आडपडदा न ठेवता बोलली.

वेस्टनचा अवतार मात्र बघण्यासारखा होता. डेनहॅमच्या सडेतोड टीकेपुढे आणि फर्नमानच्या स्पष्टपणे, आडपडदा न ठेवता विचारलेल्या प्रश्नांपुढे वेस्टनची दातखीळ बसल्यासारखी झाली होती तो उगीचच रागावून अपमानित झाल्यासारखा चेहरा करून बसला होता व उत्तर देण्याचं टाळत होता. शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली मुलांकडून जो व्यायाम करून घेण्यात येतो, त्यामागचा नक्की हेतू काय? त्यानं मुलांचा काय फायदा होणार आहे, हे काही त्याला सांगता येईना. डेनहॅमनं स्वतः बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. अशा प्रकारच्या खेळाचा सराव हा नियमितपणे, रोजच्या रोज असावा लागतो, तरच त्याचा फायदा होतो असा युक्तिवाद त्यानं केला. शारीरिक शिक्षणाच्या तासाच्या नावाखाली आठवड्यातून दोन वेळा वीस मिनिटं मुलांना सराव करायला लावणं हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, असं डेनहॅमनं स्पष्टच सांगितलं.

परत एकदा मिस फिलिप्सनं संभाषणाची सूत्र आपल्या हाती घेतली आणि मुलांमधील तिची लोकप्रियता एकदम वाढली. शाळेमध्ये मुलांना बरेच विषय नेमलेले असतात, त्यांपैकी एक विषय म्हणजे शारीरिक शिक्षण असून वर्गातील प्रत्येक मुलाला त्यापासून काहीतरी फायदा मिळावा, असा विचार करूनच त्या विषयाचं वेळापत्रक आखलेलं असतं, असं तिनं सांगितलं. शाळेकडे असलेला मोजका वेळ आणि साधन-सामग्रीची कमतरता या दोन्ही गोष्टी विचारात घेऊनच या विषयाच्या वेळापत्रकाची आखणी करावी लागते. त्यामागचा उद्देश केवळ एखाद दुसऱ्या मुलाचे हित बघणे हा नसून जास्तीत जास्त मुलांना काय सोयीचे आहे, हा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, असं तिनं स्पष्ट केलं.

अखेर ती डेनहॅमकडे रोखून बघत म्हणाली- “तुमच्यापैकी काही मुलं नशिबवान आहेत. त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित झाली आहे. ती अंगानं चांगली बळकट आहेत. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला मुलांकडून जे काही थोडेफार व्यायाम करून घेण्यात येतात. त्याचा त्यांना काही फायदा होत नसेलही, पण एक लक्षात घ्या- आणखी काही मुलं तुमच्याबरोबर आहेत, आणि त्यांच्या दृष्टीनं हा व्यायाम उपयोगी आहे. उलट तुमच्यापैकी जी मोठी आणि सशक्त मुलं आहेत, त्यांनी आपण होऊन लहान आणि दुर्बल मुलांना मदत केली पाहिजे, त्यांच्याकडून कसरत करून घेतली पाहिजे.”

या अशा गोड शब्दांना डेनहॅम भुलणारा नव्हता. तो उठून म्हणाला, “मग अशा शारीरिकदृष्ट्या दुर्बल मुलांना बोलावून घेऊन फक्त त्यांच्याकडूनच या कवायती करून का नाही घेत? त्या वेळात आम्ही उरलेली मुलं फूटबॉलसारखा एखादा खेळ खेळू शकतो. आम्ही तरी गरज नसलेल्या गोष्टी करण्यात वेळ वाया का घालवायचा?”

हा प्रश्न म्हणजे एक आव्हानच होतां. पण मिस् फिलिप्स मुळीच मागे हटली नाही. तिचं उत्तर तयारच होतं. आपले मोठेमोठे निळे डोळे डेनहॅमवर रोखून ती म्हणाली, “एक लक्षात घे डेनहॅम, व्यायाम हा केवळ शरीराचाच नसतो तर मनालाही त्याची आवश्यकता असते. शाळेचं एकंदर वेळापत्रक अशाच दृष्टीनं आखलेलं असतं, की तुम्ही ही शाळा सोडून बाहेरच्या जगात गेल्यावरही तुम्हांला त्याचा फायदा व्हावा. बाहेरच्या जगात आपल्याला अनेक अप्रिय गोष्टी कराव्याच लागतात. सगळं काही नेहमी आपल्या मनासारखं घडेल असं नाही. त्यावेळी परिस्थितीशी मिळतंजुळतं कसं घ्यायचं, याचं प्रशिक्षण शाळेत तुम्हांला देण्यात येतं. आता तुला त्या शारीरिक शिक्षणाच्या तासामागचा हेतू नीट समजला असेल, अशी मी आशा करते.’ “

हे तिचे शब्द ऐकून मात्र बिचाऱ्या डेनहॅमला गप्प बसण्यावाचून काही उपायच नव्हता. तिनं त्याला वादविवादात पूर्णपणे नामोहरम केलं होतं. त्याचा चेहरा पडला आणि मिस् फिलिप्स मात्र समाधानानं खुलून हसली. एखाद्या गोड आणि गोजिरवाण्या दिसणाऱ्या मनीनं चिमणीचा फडशा पाडून समाधानानं इकडे तिकडे पाहावं, तसा तिचा चेहरा झाला होता. आता मला कळलं- इतकी नाजूक दिसणारी ही मिस् फिलिप्स आपला वर्ग कसा काबूत ठेवते ते! यानंतर सकाळचे कार्यक्रम संपले. अखेरीस हेडमास्तर व्यासपीठावर गेले आणि त्यांनी या सभेचा समारोप केला. सभा ज्या काटेकोरपणे व व्यवस्थित रीतीने पार पाडली, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या सर्व कार्यक्रमासाठी मुलांनी जी अपरंपार मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांनी मुलांचं तोंड भरून कौतूक केलं.

See more

History of English Novel

Questions based on the novel- To Sir, with Love

Q.1. Describe a character sketch of E. R. Braithwaite, the narrator of the novel “To Sir, with Love”.  

Answer-

E. R. Braithwaite is a British person. He is the narrator of the novel “To Sir, with Love”. He tells the story of his first year of teaching at Greens Lade secondary school. Before becoming a teacher, he served six years in the military. After the military service, he tries to get  engineering jobs but he does not get any job. Finally, he turns towards a teaching career.

Braithwaite has some insecurities when he starts teaching. Being a black person, he is humiliated by the students. The students are also rude and come from the worst background. Slowly, he wins the faith of his students using his teaching abilities. By the end of the school year, Braithwaite is a beloved, warmly accepted teacher who becomes well-known in the community. Braithwaite is an intelligent, sensitive man who changes the attitude and thinking of his students.

Bottom Ad

12 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here