SSS Result– Get the latest updates
See Maharashtra State Board SSS Result 2023
Result updates
SSS Result (Std. X Result) will be declared on Friday 2 June at 1 p.m.
Result will be declared online.
Where can you see SSS Result (Std. X Result)?
कुठे पाहता येईल निकाल?
दहावीचे विद्यार्थी विविध लिंक वरून निकाल पाहू शकतात.
एखादी लिंक व्यस्त येत असेल तर अन्य लिंक पहावी.
Process to see SSS Result: निकाल पाहण्याची पद्धत-
1) Click on Results.
2) Click on SSC Examination Result March 2023
3) Enter Seat No.
4) Enter Mother’s name.
5) Click on View Result.
6) Download your S.S.S. Result.
Links to see SSS Result Maharashtra State Board 2023–
Result on Links will be available on 2 June.
विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.
See more resources-
1) Career Guidance Information
4) Std. XI Annual Activity Sheet Format
5) English Grammar Activity Workbook
7) English Grammar Online Quizzes
9) Free Text Books – Download in PDF
SSS Result-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल SSS Result Maharashtra State Board 2023 अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक २/०६/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
Schools can download consolidated SSS Result Maharashtra State Board 2023 on the following website-
शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध येथे होईल-
गुणपडताळणी व उत्तर पत्रिका झेरॉक्स प्रत साठी नंतर ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.
१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
Link-
http://verification.mh-ssc.ac.in
गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते सोमवार, दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत अर्ज कर्ता येईल.
छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरूवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
२) मार्च २०२३ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
३) मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजने अंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ०७/०६/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
५) मार्च २०२३ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत बुधवार दि.१४/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.
अकरावी व बारावीत होणारे बदल पहा-
महत्वाचे-
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
१) पासपोर्ट फोटो लावून पूर्ण भरलेला अर्ज
२) लिव्हिंग सर्टीफिकेट झेरॉक्स
३) मार्कशीट झेरॉक्स
४) आधार कार्ड झेरॉक्स
५) जातीचा दाखला झेरॉक्स (लागू असल्यास)
६) पासपोर्ट फोटो लावून आय कार्ड साठी माहिती भरलेला फार्म (आवश्यक केलेले असल्यास)
प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रवेश:-
आवश्यक कागदपत्रे:
१) लिव्हिंग सर्टीफिकेट मूळ प्रत (कायमची जमा होईल)
२) मार्कशीट मूळ प्रत (गुण व्हेरीफाय करण्यासाठी- परत केले जाईल)
Important-
Std. XI online admission process takes place only in Mumbai region, Pune, Nagpur, Amravati, and Nasik municipal areas. In other parts of Maharashtra, offline admission process will be used.