Home More Std XI Promotion GR

Std XI Promotion GR

1
Std XI Promotion GR

अकरावी च्या विद्यार्थ्यांना बारावीत प्रमोट करण्यासाठी नियम

See the Std XI Promotion GR

Download the circular for promoting students from Std. XI to XII.

इयत्ता अकरावी च्या विद्यार्थ्यांना बारावीत प्रमोट करण्यासाठी नियम पहा.

नियम: Std. XI Promotion GR

शासन पत्र क्र.परीक्षा-२०१६/प्र.क्र.१८९/एसडी-२ दि.२८/१०/२०१६ उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक अंतर्गत इयत्ता ११ वीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केला असल्याने इयत्ता ११ वीच्या उत्तीर्णतेच्या निकषामध्ये बदल करणे आवश्यक होते. सन २००७ नंतर यामध्ये बदल केलेला नाही. यापूर्वीच्या निकषामध्ये इयत्ता ११ वी साठी अनुग्रह गुण ३० दर्शविले आहेत मात्र इयत्ता १२ वी साठी अनुग्रह गुण १५ देण्यात येत असून दोन्ही मध्येही तफावत आहे. इयत्ता १२ वी ला जे अनुग्रह गुण दिले जातात तेच गुण (१५ गुण) इयत्ता ११वी साठी असणे आवश्यक होते.

सबब याबाबत शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून राज्य मंडळ समिती ठरावानुसार इ.१२ वी प्रमाणेच इ.११ वी परीक्षेस १५ अनुग्रह गुण देण्यासाठी कार्यवाही करणेस शासनाची मान्यता मिळणेसाठी संदर्भ क्र.१ नुसार प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता व संदर्भिय पत्र क्र.२ अन्वये शासनाने राज्य मंडळ नियमावली नियम क्र. ९९ मधील ३ नुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी असणाऱ्या तरतुदीप्रमाणे इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेसाठी पूर्वीच्या निकषानुसार असलेले ३० गुण बदलून १५ गुण अनुग्रह गुण म्हणून देण्यास मान्यता दिलेली आहे. तरी याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंबंधात मंडळ नियमावली नियम क्र. ९९ मधील ३ नुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांसाठी एकाच वेळी त्याच परीक्षेस प्रविष्ठ होणारा एखादा उमेदवार एका किंवा अधिक विषयात अनुत्तीर्ण होईल तर एका किंवा अधिक विषयात त्याला कमी गुण मिळाले असतील तर, एकूण कमाल १५ गुण परंतु कोणत्याही एका विषयात १०% पेक्षा जास्त असणार नाहीत इतक्या अनुग्रह गुणांची त्याला सवलत देण्यात यावी. ही सवलत फक्त घेतलेल्या एकूण विषयांपैकी ३ विषयांपुरतीच मर्यादित असेल. त्याचप्रमाणे इ. ११वी साठी १५ गुण अनुग्रह देण्यात येऊन इ.१२वी प्रमाणे अनुग्रह गुण इ.११वीला देण्यात यावेत.

स्पष्टीकरण- जास्तीत जास्त तीन विषयांसाठी 15 गुणांची ग्रेस देता येईल मात्र एका विषयासाठी जास्तीत जास्त 10 गुण ग्रेस गुण म्हणून देता येतील.

उदा. 3+2+10 असे तीन विषयांना आवश्यकतेनुसार ग्रेस गुण देता येतील.

Read Std XI Promotion GR

Click on the Backet – I’m not a robot (दोन – तीन वेळा या वाक्यासमोरील चौकोनात क्लिक करा.)

Click on Arrow to download the PDF-

परिपत्रक (Std. XI Promotion GR) डाउनलोड करा.

Download the circular (Click Here)

See more

See Result software for Std. XI

Result Software for Std. XI Arts

Result Software for Std. XI Commerce

Result Software for Std. XI Science

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version